गुन्हेगारी

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यास 10 लाख 95 हजाराच्या मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड!

अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी) मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यास 10 लाख 95 हजाराच्या मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड केल्याची पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 24/7/2023 रोजी फिर्यादी प्रदिप दत्तात्रय गारुडकर रा. केडगाव, अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, मी आज रोजी चिचोंडी पाटील शिवारातील सर्व जिओ कंपनीचे टॉवर चालू आहेत का हे पाहण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी एक टॉवर बंद असलेचे मला आढळून आले. मी आमच्या टॉवर कंपनीची केबीन पाहण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी केबीनचे कुलूप तुटलेले दिसले मी केबीनच्या आतमध्ये जावून पाहाणी केली असता मला केबीनमध्ये असलेल्या कॉस लाईट कंपनीच्या एकुण 3 बॅटऱ्या दिसून आल्या नाहीत म्हणून मी आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यानंतर मी कामरगाव हद्दीतील टॉवरची देखरेख करणारे अनिल कदम यांना फोन केला व सदर घटणेची हकीकत सांगितली त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की, आमच्या हद्दीतील टॉवर क्र 1 MH-AMDGENB-6027 या टॉवरच्या व्हीजन कंपनीच्या 5 बॉटऱ्या चोरील गेलेल्या आहेत. त्यावेळेस माझी खात्री झाली की, कोणीतरी माझ्या सहमतीशिवाय आज्ञात चोरऱ्यांनी टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेल्याबाबत गुरं.न 591/23 भादवी कलम 379 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आलेली होती.
सदर घटनेचे गांर्भिय लक्ष्यात घेवून व नगर तालुका पोलीस स्टेशनमधील ही दुसरी घटना असल्याने सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विशाल टकले असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपी याचा शोध घेण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले.
त्यानुसार सदर पथकाने मोबाईल टॉवरकडे जाण्याऱ्या रोडवरील सिसिटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम स्कुटीवरीती बॅटऱ्या घेवून जात असताना दिसून आले व तांत्रीक विशलेषनद्वारे तपास करुन गुन्हेगाराचे नाव निश्चित केले. त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी पेट्रोलींग करीत असताना शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा विनोद खिळदकर रा.विठ्ठलाचे नांदूर ता. आष्टी जिल्हा बीड हा त्याच्या राहत्या घरी आहे व तो थोडयाच वेळामध्ये तेथून निघणार आहे. त्यानुसार देशमुख यांनी सदर पथकाला सदर आरोपी यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश केला सदर पथक हे विठ्ठलाचे नांदुर ता. आष्टी जिल्हा बीड येथे जावून आरोपी याच्या राहत्या घरी जावून त्याचा शोध घेतला असता तो तेथे मिळून आलेने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद परसोराम खिळदकर वय 31 वर्षे रा. विठ्ठलाचे नांदुर ता. आष्टी जिल्हा बीड असे असलेचे सांगितले त्यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास पोलीस स्टेशन येथे आणून आजून इतर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किती गुन्हे केले आहेतबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिली त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यानी सांगितले की मी व माझा साथीदार नामे सागर धर्मा गायकवाड रा. विठ्ठलाचे नांदूर ता. आष्टी जिल्हा बीड यांनी मिळून अजून अहमदनगर व बीड जिल्ह्यातील एकूण 06 गुन्हे केलेले आहेत व त्याच्या मुद्देमाल हा लक्ष्मी लॉज जवळ माळीवाडा, अहमदनगर येथे एका गाळयामध्ये ठेवलेला आहे सांगितलेने त्यास सोबत घेवून लक्ष्मी लॉज शेजारी माळीवाडा येथे गाळयामध्ये जावून पाहणी केली असता त्याठिकाणी एकूण 44 छोटया मोठया बॉटऱ्या असा एकूण 1095000/- रु. (दहा लाख पच्यानऊ हजार रुपये ) किमती मुद्देमाल मिळून आला.
सदर आरोपी नामे विनोद परसुराम खिळदकर रा. विठ्ठलाचे नांदुर ता. आष्टी जिल्हा बीड व सागर धर्मा गायकवाड रा. विठ्ठलाचे नांदूर ता. आष्टी जिल्हा बीड यांनी खालील पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल टॉवरच्या बॉटरी व सेल काढून दिले ते खालील प्रमाणे.
1. कोतवाली पोस्टे गुरनं 757/2023 भादवी कलम 379
2. कोतवाली पोस्टे गुरनं 858/2023 भादवी कलीम 379
3. भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 475/2023 भादवी कलम 379
4. नेवासा पोस्टे गुरनं 737/2023 भादवी कलम 379
5. नगर तालुका पोस्टे गुरनं 431/2023 भादवी कलम 379
सदर आरोपी नामे विनोद परसुराम खिळदकर रा. विठ्ठलाचे नांदुर ता. आष्टी जिल्हा बीड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खालील गुन्हे दाखल आहेत.
1. आंबोरा पोलीस स्टेशन गुरनं 145/2023 भादवी कलम 379
2. आंबोरा पोलीस स्टेशन गुरनं 163/2023 भादवी कलम 457,380,34
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, उप विभागीय पोलीस अधिकारी, संपतराव भोसले साो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण,पोउनि रणजित मराग, पोहेकॉ/महेश भवर, पोकॉ/कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विशाल टकले यांचे पथकाने केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे