राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत उतरवले झेंडे घर व दुकानावर अजूनही फडकत असलेले झेंडे उतरण्याचा उपक्रम

अहमदनगर( प्रतिनिधी)-. हर घर तिरंगा द्वारे 13-15 ऑगस्ट पर्यंत घरांवर राष्ट्रध्वज तिरंगा फडकिवण्याची परवानगी होती, परंतु आज देखील अनेक घरांवर हा तिरंगा दिवस रात्र फडकत होता. *नियमाप्रमाणे राष्ट्रध्वज तिरांग्याला 15 ऑगस्ट सायंकाळीच सन्मानपूर्वक खाली घेऊन घडी करून चांगल्या ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.* अनेकांनी तसे केले नसल्याने आपल्या सन्मानाचे मान जाऊ नये म्हणून *रविवारी घर घर लंगर सेवेच्या टीम शहरात राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरण्याची मोहीम हाथी घेतली.* हे सर्व करीत असताना काही राष्ट्रध्वज फाटले तर काही माखलेल्या स्थितीत मिळाले, ते सन्मानपूर्वक गोळा करण्यात आले.
घर घर लंगर सेवेच्या टीम ने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मोहीम सुरू करण्यात आली शहरातील चाणक्य चौक, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, बंगाल चौकी, माणिक चौक, आशा टॉकीज चौक, सेनापती बापट चौक, एम जी रोड, तेलिखुंत, सर्जेपुरा, अबॉट पेट्रोल पंप जवळ, गेली वाडा या ठिकाणी मोहीम हाथी घेण्यात आली. आज सुमारे 100 झेंडे सन्मानाने खाली घेण्यात आले.
या प्रसंगी हरजीतसिंह वधवा, प्रशांत मूनोत, मनोज मदान, कैलाश नवलानि, सुनील थोरात, शरद बेरड, प्रमोद पांतम, गोविंद खुराणा, पूर्शूताम बेट्टी, किशोर मुनोत, पृथ्पालसिंह धुप्पर, गुलशन कांत्रोड, सतीश गंभीर, दलजीत सिंह वधवा, सनी वधवा आदींनी मोहिमेत भाग घेऊन जन जागृती केली.
या वेळेस हरजीत सिंह वधवा यांनी आव्हान केले की ज्यांनी राष्ट्रध्वज नाही उतरविले त्यांनी उतरून घ्यावेत आणि जिथे आपल्याला खराब स्थितित राष्ट्रध्वज आढलल्यास ते आपण गोळा करावा असे आव्हान श्री वधवा यांनी केले.