निधन
वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हा सचिव भाऊ साळवे यांचे दुःखद निधन!

अहमदनगर दि. २७ जुलै (प्रतिनिधी )फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अनुयायी, निलक्रांती चौक येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हा सचिव भाऊ साळवे यांचे अल्पशा आजाराने पहाटे दुःखद निधन झाले आहे.
आरपीआय,भीमशक्ती कार्यकर्ते,वंचित बहुजन आघाडी या सामजिक संघटनेमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांचा अंत्यविधी २७/०७/२०२३ रोजी दुपारी १:०० वाजता अहमदनगर नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.