गुन्हेगारी

कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद!

अहमदनगर दि.१८ जुलै (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर,
यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, पोकॉ/भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले. पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना दिनांक 17/07/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी शुभम चव्हाण हा भांबोरा, ता. कर्जत येथील त्याचे राहते घरी आला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम घरा बाहेर उभा असलेला दिसला. पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम ऊर्फ काळ्या नितीन ऊर्फ आसमानता-या चव्हाण, रा. कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 770/22 भादविक 302, 324, 323, 504, 34 या गुन्ह्याबाबत विचारपुस सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवुल लागला, त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधीकारी, विवेकानंद वाखारे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे