रिपाई युवक आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी इतिहासाच्या कालपटावर अहिल्यादेवींचे कर्तृत्व स्फूर्ती देणारे -विवेक भिंगारदिवे

अहमदनगर दि.३१ मे (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, उपाध्यक्ष जयराम आंग्रे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश त्रिभुवन, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, शहर उपाध्यक्ष प्रतिक नरवडे, तालुका सचिव संदेश पाटोळे, आदेश साठे, मोनू भोसले, रोहित रोकडे, सुमित गायकवाड, आकाश वैराळ, राहुल ठोंबे, सुहास ठोंबे, अविनाश ठोंबे, सिद्धांत दाभाडे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे म्हणाले की, इतिहासाच्या कालपटावर अहिल्यादेवींचे कर्तृत्व स्फूर्ती देणारे आहे. पराक्रमी, योग्य शासक, संघटक व न्यायप्रियतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान राहिले. तत्वज्ञानी राणी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. महिलांसाठी त्यांचे कार्य स्फूर्तीस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे म्हणाले की, सध्या भारतासह इतर देशात महिलांना सेनेत स्थान देण्यात येत आहे, मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये पहिली स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करुन दिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.