वारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल
वारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा
विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल
अहमदनगर दि. २६ मे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या वतीने घेण्यात
आलेल्या एच.एस.सी. फेब्रु २०२३ परीक्षेत शिशु संगोपन संस्था संचालित नगर शहरातील महेंद्र
मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल
९८.४६ टक्के लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत एकूण १९५
विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के, वाणिज्य शाखा ९८.३६ तर कला शाखेचा निकाल
९६.४२ लागला आहे. विज्ञान शाखेमधील कु.निकिता संतीन तांबे या विद्यार्थीनीने ८३.५० टक्के
गुण मिळवून प्रथम आली आहे. हिस प्रथम क्रमांकाचे
व्दितीय कोतकर श्रीतेज पोपटराव ७८.८३ टक्के
रू ११००/- रोख पारितोषिक मिळाले आहे.
तृतीय कु.गाढवे दिव्या संजय ७५.३३ टक्के
तसेच वाणिज्य शाखेचा निकाल ९८.३६ टक्के लागला असून थोरात मानसी गंगाराम ही
विद्यार्थीनी ८७.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. हिस प्रथम क्रमांकाचे रू ११००/- रोख
पारितोषिक मिळाले आहे व्दितीय काळे ऋतुजा शिवाजी ८१ टक्के व तृतीय सौरभ प्रकाश शेंडगे
७९.६७ टक्के तर कला शाखेचा निकाल 9६.४२ टक्के लागला असून कु.शुभांगी विक्रम पालवे
ही विद्याथीर्नी ७२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. हिला प्रथम क्रमांकाचे रू ११००/- रोख
पारितोषिक मिळाले आहे. व्दितीय क्रमांक प्रेम शाम धोत्रे ७०.८३ टक्के तर तृतीय क्रमांक श्रृती
मनोज साळवे ७०.१७ टक्के हिने पटकाविला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हा.चेअरमन
दशरथ खोसे, सेक्रेटरी र.धों. कासवा, सहसेकेटरी राजेश झालानी, खजिनदार अॅड विजयकुमार
मुनोत तसेच संस्थेचे विश्वस्त सीए रमेश फिरोदिया, सीए राजेंद्र गुंदेचा, मनुसखलाल पिपाडा,
दिपक गांधी, बन्सी नन्नवरे, अभय गांधी, चंद्रकांत आनेचा, सौ. रश्मी येवलेकर, संजय चोपड़ा,
श्रीम्. सुमन वारे, अभय गांधी, रमेश मनोत, शिवनारायण वर्मा, प्राचार्या सौ.के.जी.गावडे, सविता
फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी व कटारिया सर व सर्व प्राध्यापक, पालकांनी
यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.