वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिक्षणाधिकारी(मा)यांना निवेदन साई एन्जेल्स इंटरनॅशनल शाळेवर कारवाई करा! सात दिवसात कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा!

अहमदनगर दि. १५ मे (प्रतिनिधी): तवले नगर येथील साई एन्जेल्स इंटरनॅशनल शाळा ही विद्यार्थ्यांपासून आवाजावी फी आकारत आहे तरी याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही परिषदेने कुठलीही कारवाई केली नाही.
सदर तक्रारीची सखोल चौकशी व्हावी याकरीता मा.गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अहमदनगर यांना शिक्षणाधिकारी(मा) यांचे आदेशान्वये चौकशी करण्याचे सुचित केले होते. त्यास अनुसरुन मा. गट शिक्षणाधिकारी पं.स.अ.नगर यांनी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी यांचे मार्फत शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता शाळेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यानंकडुन फी वसुल केल्याचे कबुल केले असून योगेश साठे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे आढळुन आले आहे.त्याचबरोबर बालकांचा मोफत शिक्षण सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ च्या कलम ३ चा भंग केल्याचे सदर चौकशी समितीस निदर्शनास आले असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळुन आले आहे.शिक्षणाधिकारी यांनी साई एन्जल्स इंटरनॅशनल शाळेचे प्राचार्य आणि व्यवस्थापनावर कठोरात कठोर प्रशासकीय कारवाई करुन, पालकांकडून आकारण्यात आलेली अवाजवी फी परत करण्याचे आदेश द्यावेत.साई एंजल सारख्या खासगी शाळेचे व अधिकाऱ्यांचे काही हितसंबंध असल्यामुळे अधिकारी खासगी शाळेवर कारवाई करत नाही.अवाजवी फी मुळे पालकांना कर्ज घेण्याची वेळ आली आहे.शिक्षण विभागाला अधिकार असताना देखील कारवाई करत नसल्याने खासगी शाळांची मुजोरी वाढली असून त्यामुळे सर्वसामान्य पालक याला बळी पडत आहेत.. तसेच वंचित आर्थिक दुर्बल घटक बालकांना मोफत शिक्षण मिळावे म्हणुन शासनाने आरटीई अंतर्गत २५% मुला-मुलींना मोफत शिक्षणाचा अधिकार ७ दिवसाच्या आत मिळवुन द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव योगेश साठे यांनी सांगितले.