दुचाकी व एसटी अपघात! महिला जागीच ठार!

पारनेर (प्रतिनिधी १३ नोव्हेंबर)दुचाकी व एसटी अपघातामध्ये महिला जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजताशिरूर वरून दुचाकीवरून राळेगणकडे घडली.या दुर्देवी घटनेची सविस्तर माहिती अशी की,अर्जुन येधु कोळेकर (वय ५५) व त्यांची पत्नी पत्नी ताराबाई अर्जुन कोळेकर (वय ५०) राहणार राळेगण थेरपाळ हे शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या (एम एच १६ ए सि ५०३८) या दुचाकीने शिरूर वरून येत असताना शिरूर ओतूर या (एम एच ०६ एस ८९४२ ) या क्रमांकाच्या एसटी बसला ओव्हर टेक करत हा अपघात घडला. यामध्ये ताराबाई अर्जुन कोळेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर पती अर्जुन कोळेकर यांना किरकोळ दुखापत झाल्याने स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले.या दुर्देवी घटनेमुळे राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.