पदवीधर मतदारसंघासाठी ‘वंचित’तर्फे रतन बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघावर दीर्घकाळ भाजपाचे वर्चस्व राहिले. नंतर काँग्रेसने 2009 पासून आतापर्यंत या मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत उडी घेतल्याने आता आता तिरंगी सामना होणार यात शंका नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सादर केला. यावेळी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, चित्राताई कुर्हे,नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे गंगाधर अहिरे,बाळासाहेब शिंदे, विश्वनाथ भालेराव,पंडित नेतावटे,विशाल पाडमुख,दीपक पगारे,चेतन गांगुर्डे,विनोद सोनकांबळे,उर्मिलाताई गायकवाड,प्रतिक बारसे,योगेश साठे,चेतन जाधव,मंगेश पवार, चावदास भालेराव,विलास खरात,रत्नाकर साळवे,सविता पवार,आनंद बारशे,प्रभाकर कांबळे,भगवान मोरे,सुरेखाताई बर्वे,नितू सोनकांबळे, अनिताताई कांबळे अनिताताई मिरके,अमोल घोडे,बाळासाहेब घायवटे,जितेंद्र श्रिवंत,सुरेश पारखे जितेश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या बैठकीत बनसोडे यांना निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला अशी माहिती अहमदनगर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी दिली.