धार्मिक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

शिर्डी, दि.२९ मार्च (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी ही श्री. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.