आरोग्य व शिक्षण

कि.बा काकांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाली : आ.संग्राम जगताप

अहमदनगर दि.१६ जानेवारी (प्रतिनिधी)
कोविड काळात वैद्यकीय क्षेत्राने दिलेल्या निरंतर सेवेमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळाले. कोविडच्या कठीण काळात डाॅक्टर, फार्मासिस्ट, नर्स यांनी दाखवलेले धैर्य अतुलनीय असेच होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील असे विद्यार्थी घडविणार्या संस्था या आधुनिक काळातील तिर्थक्षेत्र आहेत. माजी आमदार कि.बा उर्फ काकासाहेब म्हस्के यांनी दाखवलेल्या दुरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेवू शकले. काकांच्या पुण्याईमुळे तसेच डॉ.सुभाष म्हस्के सरांच्या कुशल नेतृत्वामुळे होमिओपॅथी, नर्सिंग, फार्मसी शाखेत विद्यार्थ्यांना जनसेवेची आणि करीअरची संधी उपलब्ध झाली. म्हस्के परिवाराच्या योगदानामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशनने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात राज्यभर नावलौकिक प्राप्त केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले.
कै.काकासाहेब म्हस्के आणि कै. पार्वतीबाई म्हस्के यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ.जगताप बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के, विश्वस्त डॉ.सुमती म्हस्के, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ.दिप्ती ठाकरे, प्रशासक समीर ठाकरे, डाॅ. केतकी म्हस्के, डॉ.प्रकाश पाटील, डॉ.अजिंक्य पाटील, डॉ.अजित फुंदे, नवनागापूरचे सरपंच दत्ता सप्रे, नगरसेवक राजेश कातोरे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी काॅलेजच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोज, काकासाहेब म्हस्के डी.फार्मसी काॅलेजचे प्राचार्य रविंद्र हनवटे, पार्वतीबाई म्हस्के इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य अजित चवरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले की, काकासाहेब म्हस्के यांचे नगर जिल्ह्याच्या शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या प्रेरणेतूनच वैद्यकीय संस्था उभ्या राहिल्या. म्हस्के परिवाराची तिसरी पिढी काकांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांसाठी इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संधिवात या विषयावर आयुर्वेद तज्ञ डॉ. अक्कलकोटकर, होमिओपॅथी तज्ञ डॉ. मयुर महाजन आणि गुडघा आणि खुबा जाॅईट रिप्लेसमेंट तज्ञ डॉ.अभितेज म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चौकट
डाॅ. अभितेज यांचा नगरकर म्हणून अभिमान वाटतो

यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले की, डॉ.अभितेज म्हस्के यांनी युरोपमध्ये दहा वर्षे शिक्षण आणि वैद्यकीय सेवा दिल्यानंतर ते भारतात आरोग्य सेवा देत आहेत. महिन्यातून एक दिवस ते नगरला सेवा देतात. खुबा आणि गुडघा प्रत्यारोपण आणि पुर्नरोपण यामध्ये त्यांनी कौशल्य प्राप्त केले असून असे उपचार करणारे ते देशातील एकमेव डाॅक्टर आहेत. नगरकर म्हणून डॉ.अभितेज म्हस्के यांचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे