विकास कार्यकारी सोसायटी, शेंडी येथे चोरी करणारा गुन्हेगार अटकेत,16 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त , एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

अहमदनगर दि. ९ मार्च (प्रतिनिधी)
दिनांक 06/03/23 रोजी शेंडी गावामधील विकास कार्यकारी सहकारी सोसायटी मधे चोरी झाली होती त्याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गु र न 192/2023 ipc 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
दिनांक 07/03/23 रोजी स पो नि राजेंद्र सानप याना बातमी मिळाले वरून सदरची चोरी ही आशिष नाना देठे रा. शेंडी व त्याच्या साथीदाराणी केल्याची तपासात निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेले इन्व्हर्टर , बॅटरी,MPS असा 16 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदर आरोपी आशिष नाना देठे यास 01 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि राजेंद्र सानप , पोना गणेश कावरे, पोना संदीप आव्हाड, पोना दीपक गांगर्डे, HC रमेश थोरवे,HC मोहमद शेख यांनी केलेली आहे.