दबंगगिरी एक खाकीया मराठी चित्रपटाच्या संदर्भात बोधेगाव येथे बैठक घेऊन चित्रपटाचे केले नियोजन

पाथर्डी दि.५ फेब्रुवारी (प्रतिनिधी)
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे,बन्नोबा दर्ग्यात चादर अर्पण करून शनिवार दिनांक ४\२\२०२३ रोजी दबंगगिरी बेधडक एक खाकी या मराठी चित्रपटाच्या शूटींग ची नियोजन बैठक बोधेगाव ता शेवगाव माॅ बनौमाॅ च्या पवित्र मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात पार पडला.या बैठकीत या चित्रपटाचे दिग्दर्शक मा.पांडुरंग गोरे .सर.यांनी प्रास्ताविक केले .तसेच श्री.सुदाम संसारे.सर यांनी या नियोजन बैठकीत मार्गदर्शन केले या बैठकीला औरंगाबाद येथुन अभिनेत्री सौ.वंदना गव्हाणे मॅडम,पुणे येथुन सौ.सुनंदाताई सुर्यवंशी मॅडम,पाथर्डी येथुन अभिनेते.वजीर भाई शेख व त्यांचे सहकारी जावेदभाई तसेच दौंड साहेब. वैजापुर येथुन अभिनेते श्री.संभाजीराव खैरे,पत्रकार मंडळी व बोधेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .लवकरात लवकर या चित्रपटाची शूटींग चालु करणार आल्याचे श्री.पांडुरंग गोरे. सर यांनी सांगितले शेवटी स्वादिष्ट आशा गोड जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला.