अहिल्यानगर दि. 29 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहराचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी महानगर पालिकेच्या नगरसेविका शीतलताई जगताप मैदानात उतरल्या आहेत.
त्यांनी भिंगार येथे घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत महिलांशी संवाद साधला. यावेळी भिंगार येथील महिलांनी आमदार संग्राम जगताप हे विकास कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा