केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न! युवकांनी मैदानी खेळाकडे वळावे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर दि.३० जानेवारी (प्रतिनिधी) – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल मुळे विद्यार्थी व युवा वर्ग मैदानी खेळाकडे वळताना दिसून येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मैदानी खेळ कमी होत चालले आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय शिक्षणाबरोबर मैदानी खेळाकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन क्रिडा स्पर्धेचे आयोजन करून युवकांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून द्यावे. खेळाच्या माध्यमातून युवकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते. आता युवकांना विविध क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत यासाठी युवकांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपल्या आवडीच्या खेळामध्ये करियर करावे. केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून परिसरातील युवकांना क्रिकेट खेळाचा आनंद लुटता येईल असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
सोनेवाडी रोड येथे केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, आयोजक सोनू घेंमुड, सुमित लोंढे, अमोल ठूबे, अशोक कराळे, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, संजय लोंढे, अजित कोतकर, माऊली जाधव, ऋषिकेश गवळी, नवनाथ घेंमूड, अनिकेत लोंढे, तुकाराम कोतकर, रवी कराळे, अमोल शिंदे, सचिन घेंमूड, निलेश लोळगे, राहुल शिंदे, मनोज घेंमूड, मल्हारी आव्हाड, गणेश दिवटे, विकी हूरुळे, विशाल धोंडे, सतीश चंदन, आदी लोंढे, गोरख गुंड, अजित ठूबे, ओंकार कोतकर, उमेश ठोंबरे, संग्राम गुंड, पवन वीर, दत्ता गिरमे, आदेश हजारे, पप्पू साबळे, भैया पुजारी, दादा नेमाने आदिंसह उपस्थित होते.
यावेळी सोनू घेंमूड म्हणाले की, केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या, माध्यमातून युवकांना खेळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची गुणवत्ता सिद्ध होत असते. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सराव मिळाल्यास उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतो. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून केडगाव परिसरात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत असे ते म्हणाले.