तोफखाना पोलिसांची दबंग कामगिरी! मध्यप्रदेशातील गावठी कट्टे बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत दोन आरोपींना घेतले ताब्यात!

अहमदनगर दि.२४ जानेवारी (प्रतिनिधी) तोफखाना पोलिसांनी दबंग कामगिरी करत
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला असून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.या दमदार कारवाईमुळे जिल्ह्यात तोफखाना पोलीस ठाण्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या दबंग कामगिरीची सविस्तर माहिती अशी की,
अहमदनगर जिल्ह्यात तसेच शहरात गावठी कट्टे विक्रीसाठी येत होते. त्यातच ही कारवाई झाल्यामुळे गावठी कट्टे विक्रीला नक्कीच आळा बसेल.हे आरोपी मध्यप्रदेश मधील वडवणी तालुक्यातील खुरमाबाद या ठिकाणी गावठी कट्टे बनवून त्याची विक्री करत होता.तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांचे पथक मध्यप्रदेश मध्ये गेले होते. त्या ठिकाणी खुरमाबाद येथे एका झोपडीमध्ये हा कारखाना सुरू होता गावठी कट्टे बनवत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून त्यांना रंगेहात पकडले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे,तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोना/संदीप धामणे,पो कॉ/संदीप गिरे,पोकॉ/सतीश त्रिभुवन,पोकॉ/सुनील शिरसाठ,पोना/सुरेश वाबळे यांनी केली आहे.