रविवारी वासुंदे येथे वयोवृध्दांना २कोटी रू. चे जीवांवश्यक साहित्यांचे वाटप – सुजित झावरे

पारनेर दि.२ जून (प्रतिनिधी)
राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे टाकळी ढोकेश्र्वर येथे घेण्यात आलेल्या शिबिरामधील नोंदणी केलेल्या ज्येष्ठांना विविध जीवानावश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भारत देशातील नंबर २चा सर्वात मोठा राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शिबिर अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आले. त्यात पारनेर तालुका अव्वल नंबर आहे. टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी गटात सर्वात जास्त लाभार्थीचा समावेश आहे. या दोन्ही गटात ७ कोटी रु. जिवानावश्यक साहित्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे. यामध्ये श्रवणयंत्र, नंबरचा चष्मा, काठी, सेन्सर काठी, कृत्रिम दात, कुबड्या, वॉकर, व्हील चेअर, व्हील चेअर (कमोड ), गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन बुट इनसोल इ. विविध साहित्याचे वाटप टाकळी ढोकेश्वर, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी, वासुंदे, बोकनकवाडी, वडगाव सावताळ, गाजदीपुर, खडकवाडी, मांडवे खु., देसवडे इ. गावातील लाभार्थीना करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकारांना बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, या योजने अंतर्गत तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे अत्यंत पुण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. टाकळी ढोकेश्र्वर, ढवळपुरी भागात आदिवासी, मागासवर्गीय तसेच गोरगरीब असल्याने बराच वेळा ज्येष्ठ नागरिकांना साहित्य आणण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते तसेच अनेक वृध्दांना त्यांचे मुले देखील सांभाळ करत नाही अश्या ज्येष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत जीवानावश्यक साहित्यांचे वाटप करून आधार देण्याचे काम राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. याचे मनस्वी आनंद होत आहे.
रविवार दि.५ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. साई प्रसाद मंगल कार्यालय, वासुंदे. याठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य या योजने अंतर्गत वाटप करण्यात येणार असून यावेळी सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्याच्या वतीने डॉ सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.