सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल उद्धव शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करुन प्रोत्साहन – माधवराव लामखडे

अहमदनगर- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालीम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना सामाजिक कार्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
निमगांव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते हा पुरस्कार शिंदे यांनी स्वीकारला. शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, डॉ.विजय जाधव, नगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत बोडखे, राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे- ठाणगे, अतुल फलके आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मिळालेल्या या पुरस्काराने व सन्मानाने समाजात काम करण्याची उमेद वाढेल व प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली.