ब्रेकिंग
महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने ” या” हॉस्पिटलला बजावली नोटीस

अहमदनगर दि.१३ जानेवारी (प्रतिनिधी)
पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी महानगर पालिका आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभाग निवेदन देले होते. की महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या तारकपूर बस स्टँड जवळील झेंडे हॉस्पिटलने महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम तोडत रस्त्यालगतच आवाराची भिंत बांधल्याचे तसेच पार्किंग च्या जागेत अनधिकृत बांधकाम केलेची तक्रार करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने महानगर पालिका आयुक्त यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने झेंडे हॉस्पिटल यांना नोटीस बजावण्यात आली आहे.