ब्रेकिंग
मिरजगाव मध्ये मातंग समाजाच्या तरुणाची आत्महत्या!

दि. १३ जानेवारी (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव मातंग समाजाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पप्पू बिरू सकट ( वय वर्ष 42) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने जीवनाला कंटाळून आज सकाळी पाच वाजताच्या दरम्यान मिरजगाव बस स्थानकाच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ही आत्महत्या संशयित असल्याची चर्चा मिरजगाव परिसरामधील नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व हेड कॉन्स्टेबल पवार दादा हे पुढील तपास करीत आहेत.