सीना नागरी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी मिरजगाव मध्ये रास्ता रोको!

मिरजगाव (प्रतिनिधी)
मिरजगाव येथील नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवरा प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करून पैसे परत द्यावेत या मागणीसाठी नगर सोलापूर रोड वर क्रांती चौक येथे संतप्त ठेवीदारांकडून रास्ता रोको करण्यात आला.
या आंदोलनाला सर्व ग्रामस्थांनी व व्यापारी वर्गाने गाव बंद ठेवून पाठिंबा दिला.
या आंदोलनात अपंग विधवा मोलमजूर गरीब कष्टकरी ठेवीदारांनी आपली व्यथा व झालेली फसवणूक व्यक्त करत सीना नागरी पतसंस्था च्या संचालक बॉडीवर कठोर कारवाईची मागणी केली.
हा रास्ता रोको तब्बल दोन तास चालू होता यावेळी गाड्यांच्या लांबच लांब रांगा पायाला मिळाल्या
आंदोलकांनी बोलता वेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून चुकीच्या दिशेने तपास चालू आहे व आम्हाला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन व अधिकारी कुठेतरी कमी पडत आहेत अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली. या संस्थेमध्ये तब्बल नऊ कोटींचा गैरव्यवहार पुढे आला आहे असे आंदोलकांनी सांगितले तर संपूर्ण 13 कोटींचा हा घोटाळा आहे असे आरोप करण्यात आले. पैशान अभावी मुला मुलींचे शिक्षण व लग्न रखडल्याचे यावेळी सांगितले गेले तर निर आधारांना औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मांडत एका अपंग व्यक्तीला अश्रू अनावर झाले.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ए बी चेडे व चेअरमन एकनाथ खेतमाळ यांच्या विश्वासावर सर्वसामान्य लोकांनी पैसे ठेवले होते या सर्व ठेवीदारांचा विश्वासघात केला गेला आहे असे मत व्यक्त केले आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी यावेळी ठेवीदारांनी केली.
आंदोलकांना उत्तर देत कर्जतचे सहाय्यक निबंध सुखदेव सूर्यवंशी यांनी सांगितले की संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई केली आहे 31 डिसेंबर पर्यंत ठेवीदारांना शांत राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या आंदोलनात माजी सरपंच सारंग घोडेस्वार सुनील बावडकर अण्णा दळवी फारुक शेख सादिक शेख मीराबाई रायते बेबी भोसले अनिता गदादे म्हेत्रे गुरुजी सुधीर आखाडे आदी ठेवीदार उपस्थित होते
आंदोलनात मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व हवालदार बबन दहिफळे व इतर कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.