लोकनेते भैय्यासाहेब तथा मिलिंद गायकवाड यांच्या 62 व्या जयंती दिनानिमित्त पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील झुंजार नेतृत्व प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या औरंगाबाद विद्यापीठ नामांतरण लढ्यातील सहकारी व कार्यकर्ते दिवंगत भैय्यासाहेब तथा मिलिंद गायकवाड यांच्या 62 व्या जयंती निमित्त पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठनेते अशोक गायकवाड, अजय साळवे, , प्रा.जयंत गायकवाड, संजय कांबळे, रोहित आव्हाड, सुमेध गायकवाड ,प्रा.भिमराव पगारे, सोमा शिंदे, सम्राट पटेकर, नितीन कसबेकर, श्रीकांत पाखरे, सारंग पटेकर, विशाल गायकवाड, अजय पाखरे, सिद्धांत गायकवाड, धम्मा गायकवाड, राजीव ससाणे, राहुल परदेशी, अंकुश कळमकर, मुख्याध्यापक उकेर्डेसर, मंगल ताई पटेकर, अश्विनी गायकवाड, भावना गायकवाड, साची गायकवाड, रुही गायकवाड आदी उपस्थित होते. भैय्यासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सुमेध गायकवाड व हेमाताई मिलिंद गायकवाड परिवाराच्या वतीने शाळेसाठी फायबर खुर्च्या व विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
तसेच गायकवाड परिवाराच्या वतीने तथागत बुद्धिस्ट सोसायटीला धम्मचारी संजय कांबळे यांच्याकडे आर्थिक मदत देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा जयंत गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर उंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड परिवाराच्या वतीने मानण्यात आले.