गुन्हेगारी

संगमनेर येथे एक हजार किलो गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त!

अहमदनगर दि.६ डिसेंबर (प्रतिनिधी) संगमनेर येथे एक हजार किलो गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त केल्याची मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईची माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, संतोष लोढे, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण व चापोहेकॉ/बबन बेरड अशांना बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम गोवंश जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन कत्तल करुन महिंद्रा झायलो व छोटा हत्ती अशा वाहनातुन रेहमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर येथुन वाहतुक करणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संगमनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन रहेमतनगर, जोर्वे रोड, ता. संगमनेर येथे जावुन रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद महिंद्रा झायलो व छोटा हत्ती टेम्पो येताना दिसले चालकास बॅटरीने लाईट दाखवुन थांबण्याचा इशारा करताच झायलो चालकाने गाडी थांबवली पोलीस पथकाची चाहुल लागताच पाठीमागे असलेला छोटा हत्ती टेम्पो मधील चालक गाडी सोडुन पळुन गेला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या झायलो चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) सलमान नजीर शेख, वय 20, रा. नाईकवाड पुरा, ता. संगमनेर असे सांगितले. त्यास छोटा हत्ती टेम्पो वरील पळुन गेलेल्या चालकाचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव 2) बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी, रा. भारतनगर, ता. संगमनेर असे असल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यातील महिंद्रा झायलो कार व छोटा हत्ती टेम्पोची पंचा समक्ष झडती घेता त्यामध्ये गोमास मिळुन आले सदर गोमासची खात्री करता ते गोवंश जनावराचे मास असले बाबत निष्पन्न झाल्याने ताब्यातील आरोपी नामे सलमान शेख याचेकडे वाहनातील गोमास बाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने दोन्ही वाहनातील गोमास फरार आरोपी नामे बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी याचे मालकीचा असुन विक्री करण्यासाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 1,000 किलो गोमास, वाहतुकीसाठी वापरलेला एक महिंद्रा झायलो कार व एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण 8,50,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर बाबत पोना/1487 सचिन दत्तात्रय आडबल, ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन 1029/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात सह गुन्हे दाखल असुन त्यांची माहिती खालील प्रमाणे-

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर शहर 323/2019 भादविक 326, 323, 504, 506, 143, 147
2. संगमनेर शहर 47/2016 म.प्रा.सं.का.क. 5 (अ) (1), 9
3. संगमनेर शहर 02/2017 म.प्रा.सं.का.क. 5 (अ) (1), 9
4. संगमनेर शहर 518/2021 प्रा.क्रु.वा.का.क. 269, 429, 34
5. संगमनेर शहर 168/2020 म.प्रा.सं.का.क. 3 (क), 9 (अ)
6. संगमनेर शहर 1029/2022 भादविक 269, 34 सह
म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे