गुन्हेगारी

कर्जत तालुक्यातील चिलवडी शिवार, राशीन करमाळा रोड, येथे 8 लाख 28 हजार रुपयांचा अवैध मद्याचा साठा जप्‍त राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या अहमदनगर पथकाची

अहमदनगर, 19 ऑगस्‍ट (प्रतिनिधी) – दुय्यम निरीक्षक राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग ब-2, अहमदनगर पथकातर्फे 18 ऑगस्‍ट 2022 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चिलवडी शिवार, राशीन करमाळा रोडवर, कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर येथे 8 लाख 28 हजार 100 रुपयांचा अवैध मद्याचा मुद्देमाल जप्‍त केला असून वाहतुक करीत असताना वाहनाचा पाठलाग केला असता जप्त केलेल्या वाहनामध्ये गोवा राज्य निर्मितीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आल्‍याचे, अधिक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, अहमदनगर यांनी कळविले आहे.
या गुन्हयाची अधिकच्‍या माहितीप्रमाणे प्रथम दर्शनी दिसून येते की, परराज्यातील मद्य, महाराष्ट्रात आणून त्याची अवैध विक्री करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे दिसून येते. या गुन्हयात बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा वाहतुक केल्याने, उत्तरेश्वर गोरख बदे, रा. वलटे वस्ती, उमरड, ता. करमाळा जि. सोलापूर या आरोपीस अटक करण्यांत आली आणि एक आरोपी फरार झालेला आहे. या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून या गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्री. आर. पी. दांगट दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब-२. अहमदनगर हे करीत आहेत. असे अधिक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे