व्यवसाय करतांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी:श्रीनिवास बोज्जा

अहमदनगर दि. २८ जुलै (प्रतिनिधी) – भिस्तबाग परिसरात जगदंबा सर्जिकल या नवीन दालनाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व नितीन (बाळासाहेब ) बारस्कर यांचे हस्ते झाले. या वेळी एस बी आय व्यवस्थापक अतुल कोळपकर, हरिष देशमुख, संपत दाणी, राहुल पवार, रॉकी आंधळे, बबन बारस्कर व जगदंबा सर्जिकल चे संचालक सचिन काथवटे,
आदी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा म्हणाले कोणताही व्यवसाय करीत असतांना आपण एक व्यापारी आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. मेडिकल व सर्जीकल या व्यवसाया मध्ये वस्तूचे खरी किंमत व छापील किंमती मध्ये मोठी तफावत असते यासाठी ग्राहकांची फसवणूक न करता आपण एक व्यापारी आहोत याची जाणीव ठेवावी. अनेक व्यवसायिक लुबाडणूक करीत असल्याचे प्रसार माध्यमातून वाचण्यात येते. यासाठी व्यापाऱ्यांनी व्यवसाय करतांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व्यवसाय करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.
या वेळी या भागातील नगरसेवक सौ. दीपाली बारस्कर यांचे पती नितीन (बाळासाहेब) बारस्कर यांनी शुभेच्छा देतांना म्हणाले की, या भागात हा व्यवसाय कुठे ही नाही त्यामुळे नक्कीच या व्यवसायाचा फायदा या भागातील नागरिकांना होईल.
व्यवसायिक सचिन काथवटे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आभार नवनाथ भुसारी यांनी मानले.