सामाजिक

सावित्रीबाई – महात्मा फुलेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे – किरण काळे ; शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न

सावित्रीबाई – महात्मा फुलेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे – किरण काळे ;
शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : देश पारतंत्र्यात असताना शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये मुलभूत पायाभरणी करण्याचे काम महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या दांपत्याने केले. फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

काळे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला होता. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे. समाजाला प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. त्यांनी त्यावेळी केलेले काम हे आजही तितकेच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले हे क्रांतीसुर्य म्हणून जनसामान्यांच्या मनामध्ये आहेत. त्यांचा विचार हा समाजातील तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम कायमच काँग्रेस पक्षाने केल आहे.

यावेळी माजी विरोधी पक्ष नेता दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, राष्ट्रीय ओबीसी काँग्रेसच्या समन्वयक मंगलताई भुजबळ, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, सावेडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंजिनियर सुजित क्षेत्रे, विद्यार्थी काँग्रेसचे किशोर कांबळे, आकाश जाधव, गणेश चव्हाण, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट, शहर जिल्हा महासचिव इमरान शेख, शहर जिल्हा सचिव गणेश आपारे, संदीप पडोळे, अमित लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे