सामाजिक

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून मुळे गरजूना आरोग्य सुविधा देणे सुकर – डॉ. सुनील पवार अहमदनगर होमिओ पॅथीक कॉलेज व हॉस्पिटल लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून व सूर्या फौंडेशन चे संयुक्त विद्यमाने सिव्हिल हडको येथे सर्व रोग निदान शिबीर संम्पन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) -अहमदनगर होमिओ पॅथीक कॉलेज व हॉस्पिटल लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून व सूर्या फौंडेशन चे संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हडको येथे सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज व हॉस्पिटल चे प्राचार्य डॉ. सुनील पवार,सूर्या फौंडेशन चे अध्यक्ष काका शेळके, लायन्स क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, संस्थापक श्रीकांत मांढरे, प्रोजेक्ट चेअरमन विनय गुंदेचा, श्री. प्रसाद मांढरे, ऍडव्होकेट रवींद्र शितोळे, डॉ. शरद ठुबे,डॉ. सौ. कल्पना ठुबे, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, सौ. कलावती शेळके व पप्पू शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या वेळी बोलतांना डॉ. सुनील पवार म्हणालेत आज आरोग्य उपचार महागडे असल्याने आजारी माणसे उपचार घेत नाही व त्यामुळे आजार वाढतात. आज लायन्स क्लब च्या वतीने जे शिबीर आयोजित केले त्या मुळे आरोग्य सुविधा देणे सुकर झाले आहे.

या वेळी क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी क्लब बद्दल माहिती देऊन क्लब सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत असून आता आरोग्यशिबीरे संपूर्ण अहमदनगर शहर व उपनगरामध्ये राबविणार आहे.या वेळी क्लब चे संस्थापक श्रीकांत मांढरे यांनी क्लब ने केलेल्या कार्याची माहिती दिली.
या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी व नागरिकांनी घेतला. सदर शिबिरास अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज व हॉस्पिटलचे डॉ. शिल्पा ढोणे, डॉ. ज्योती तांबे, डॉ. सोनाली वारे, डॉ. पूनम धवर, डॉ. माधुरी मोरे, डॉ. पूजा भंडारी आदींनी सदर शिबीर यशस्वी होण्यास सहकार्य केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रसाद मांढरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. कल्पना ठुबे यांनी केले तरं आभार विनय गुंदेचा यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे