राजकिय

प्रभाग क्रमांक 13 च्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा व आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे हात मजबूत करा : सुरेश बनसोडे बुरडगाव रस्त्यावरील क्षेत्रे चाळ परिसरातील महिलांनी औक्षण करत केले उमेदवारांचे स्वागत

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 11 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. सर्वच प्रभागातून प्रचाराचा जोर वाढला आहे.
प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रभागातील बुरडगाव रस्त्यावरील क्षेत्रे चाळ परिसरातील मतदारांनी बैठकिचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना सुरेश बनसोडे म्हणाले प्रभाग क्रमांक 13 च्या क्षेत्रे चाळीतील विविध समस्या सोडविण्यासाठी व प्रभागाच्या संपूर्ण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जेष्ठ नेते अविनाश (तात्या ) घुले बोलतांना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी विशेष लक्ष घालून शहरात उभारला गेला, या कार्यात सुरेशभाऊ बनसोडे यांचा मोठा वाटा असून सर्व बहुजन समाजासाठी ती आभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महिला मतदार बहिणींनी सर्व उमेदवारांचे औक्षण करत त्यांचे स्वागत केले. आम्ही सर्व मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाच्या उमदेवारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी महेंद्र (गोरख ) पडोळे, विपुल शेटीया,कोके पाटील, सुहास शिरसाठ, सतीश (बंटी) शिरसाठ,
योगेश थोरात, जयवंत घाटविसावे, सागर भिंगारदिवे, प्रशांत पाटोळे, निलेश क्षेत्रे,आकाश शिरसाठ, किरण चंदनशिवे, अनिकेत आरोळे, सागर ठोकळ, संदीप पाटोळे, नितीन शिंदे, जय शिंदे, राजू क्षेत्रे,अक्षय चंदनशिवे, लता शिंदे, त्रिशला शिंदे, पद्मा क्षेत्रे, आरती क्षेत्रे,माधुरी क्षेत्रे, सोनाली ठोकळ, संध्या शिंदे, सोनाली शिंदे, पूनम घाटविसावे, सुवर्णा शिंदे, पूजा शिंदे, व परिसरातील नागरिक मोठया उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे