बुद्धांचे तत्त्वज्ञान जीवनात भरकटलेल्या व्यक्तींना दिशा देते : प्रा. विलास साठे
वासुंदे येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

पारनेर दि.१९ मे (प्रतिनिधी) :
मानवी जीवन समस्या, अडी-अडचणींनी व्यापलेलं आहे. जीवनातली प्रतिकूल परिस्थिती, समस्यांवर मात करताना, जीवनाचा योग्य मार्ग शोधताना अनेकांना नैराश्य येतं, हताश वाटतं. प्रत्येक धर्माचं विशिष्ट असं तत्त्वज्ञान, आचरणाचे नीती-नियम असतात. माणसानं जीवनातल्या समस्यांवर, नैराश्यावर आणि प्रश्नांवर कशा प्रकारे तोडगा काढवा आणि जीवन सुखकर कसं करावं, याविषयीचं मार्गदर्शन प्रत्येक धर्मातल्या तत्त्वांमधून मिळतं. सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींचं समर्थन करून भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यांनी सांगितलेली वचनं, तत्त्वज्ञान आजही जीवनात भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवतात. गौतम बुद्धांची वचनं वाचल्यानंतर माणसाच्या मनातले सर्व गोंधळ, द्वंद्वं दूर होऊ शकतात. त्याला जीवनाचा योग्य मार्ग नक्कीच गवसतो. असे मत यावेळी बोलताना वासुंदे येथील आदर्श ग्रामपंचायत सदस्य प्रा. विलास साठे सर यांनी व्यक्त केले.
वासुंदे येथील सामाजिक सभाग्रहांमध्ये बुद्ध पौर्णिमा यावेळी साजरी करण्यात आली.
यावेळी आदर्श ग्रामपंचायत सदस्य प्रा. विलास साठे सर, रिपाइं पारनेर तालुका उपाध्यक्ष राजेशभैय्या साठे, युवा नेते सचिन साठे, पै. उत्तम साठे, बाळासाहेब साठे, विष्णू साठे, सुरेश साठे, रमेश साठे, राहुल साठे, विलास द. साठे, साहेबराव साठे, अविनाश साठे, अशोक साठे, उज्वला साठे, ऐश्वर्या साठे, ज्योती जाधव, कुमुदिनी शेळके, हिराबाई साठे, गौतमी साठे, काजल खोडदे, तेजल खोडदे, आयुष साठे, पियुष साठे, दिव्या देसाई, कैवल्य साठे, अक्षय साठे आदी वासुंदे येथील भीम ज्योत तरुण मंडळाचे युवा सहकारी तसेच वासुंदे येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.