गुन्हेगारी
भिंगार पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिणे चोरणाऱ्या २ महिला पोलिसांच्या ताब्यात!

अहमदनगर दि.१९ मे ( प्रतिनिधी) भिंगार पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिणे चोरणाऱ्या २ महिलांना भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या बाबतची हकीगत अशी की फिर्यादी हे चिचोंडी पाटील(ता.नगर) ते अहमदनगर असा रिक्षाने प्रवास करताना अचानक त्यांच्या बॅगमधील आठतोळे सोन्याचे दागिणे चोरल्याचे त्यांना समजले.भिंगार कॅम्प पोलीसांच्या सतर्कते मुळे हे दागिणे चोरणाऱ्या शालन ऊर्फ शारदा हारकू भोसले(वय ४०, रा.शेवगाव)आणी भाग्यश्री जगदीश काळे(वय २०,रा.घोटन ता.शेवगाव)यांना कॅम्प पोलीसांनी तात्काळ पकडले.याप्रकरणी मुंबई पोलीस दलात असलेले अशोक जिजाबा काळे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.