कौतुकास्पद

वृक्ष संवर्धनासाठी शिवशाही हेल्प अँड केअर संस्थेच्यावतीने पाण्याचे टँकर

कर्जत( प्रतिनिधी ): दि १९ मे
कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर मोठे काम सुरू असल्याने शिवशाही हेल्प अँड केअर संस्थेच्या वतीने घनवन प्रकल्प- १ करीता वृक्ष संवर्धनासाठी सहा टँकर आणि रेहकुरी वन्यजीव अभयारण्य येथील प्राणी आणि पशु साठी पाणवठ्यावर एक टँकर पाणी देण्यात येत आहे अशी माहिती शिवशाही हेल्प अँड केअर संस्थेच्या राज्याध्यक्षा सौ.संध्या विजयकुमार तोरडमल यांनी दिली. व्यावसायाबरोबर सामाजिक कार्यात सहभागी होत सामाजिक भान जपणारी शिवशाही पैठणी नेटवर्क ही राज्यभर काम करणारी संस्था आहे.
शिवशाही पैठणी नेटवर्क या महाराष्ट्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या संस्थेचे संस्थापक शुभम नाकोड व मार्गदर्शक गौरव क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात २६ हजार महिला काम करीत आहेत. संस्थेच्या अध्यक्षा सौ.संध्या तोरडमल, उपाध्यक्षा सौ. चैताली जार्वेकर, सचिव कु.प्रतीक्षा क्षीरसागर यांनी पर्यावरणासाठी सुरू असलेल्या कार्यास दि.१९ रोजी कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे सुरू असलेल्या कार्यास पाण्याचे टँकर उपलब्ध करीत दिलासा दिला आहे. शिवशाही हेल्प अँड केअर संस्थेच्या वतीने घनवन प्रकल्प १ साठी वृक्ष संवर्धनास सहा टँकर आणि रेहकुरी वन्यजीव अभयारण्य येथील प्राणी आणि पशु साठी पाणवठ्यावर एक टँकर पाणी दिले आहे. यावेळी संस्थेच्या राज्यध्यक्षा सौ. संध्या विजयकुमार तोरडमल म्हणाल्या की, कर्जत येथील सामाजिक संघटना ही गेल्या ५९५ दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात सलग श्रमदान करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संगोपन करीत आहे. या कार्यात आपल्या संस्थेचाही वाटा असावा म्हणून आमच्या संस्थेने आज टँकरद्वारे पाणी पुरवठा करून या महान कार्यास हातभार लावण्याचा निर्णय घेतला. भविष्यात सामाजिक कार्यात विधायक काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतने शिवशाही हेल्प अँड केअर संस्था यांचे आभार मानले. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे पुरुष आणि महिला स्वयंसेवक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे