गुन्हेगारी

भिस्तबाग येथे रात्रीचे वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर 16 नोव्हेंबर-2022 (प्रतिनिधी) तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिस्तबाग येथे रात्रीचे वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.या कारवाईत ३,१०,०००/- (तीन लाख दहा हजार) रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळाली आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक १०/०६/२०२२ रोजी रात्री फिर्यादी श्री. अभिजीत अरविंद गर्गे, वय ५५, धंदा नोकरी, रा. सुदर्शन रो-हौसिंग, साईराम नगर, भिस्तबाग चौक, अहमदनगर यांचे घरी दि. ११/०६/ २०२२ रोजी नातीचा नामकरण सोहळा असल्याने त्यांचे नातेवाई मुक्कामी आले होते. फिर्यादीचे कुटुंबिय व नातेवाईक यांनी एकत्रित जेवण केल्यानंतर घराची दार-खिडक्या बंद करुन झोपी गेले. त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादीचे घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करुन, घरातील बॅगेमध्ये ठेवलेले १३,४२,०००/- रु. किंमतीचे ४१ तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले. सदर घटने बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७९ / २०२२ भादविक ४५७, ३८० प्रमाणे रात्रीची घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.

नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, पोहेका/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/ शंकर चौधरी, भिमराज खर्से, संदीप चव्हाण पोकों/विनोद मासाळकर, आकाश काळे, चापोहेकॉ / बबन बेरड व अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड घरफोडीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक पेट्रोलिंग करुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे लिमनेश चव्हाण रा. आष्टी, जिल्हा बीड हा एका मोटार सायकलवर चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी जामखेड ते अहमदनगर रोडने अहमदनगरकडे येत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / कटके यांनी सदर माहिती पथकास कळवून खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर जामखेड रोडने टाकळीकाझी येथील बंद असलेल्या टोलनाक्या जवळ जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम मोटार सायकलवर जामखेडकडुन नगरकडे जारात मोटार सायकलवर येतांना दिसला. पोलीस पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्यास हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. सदर संशयीत इसमाने मोटार सायकलचा वेग कमी करुन मागे पळून जाण्याच्या बेतात असतांना पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमा पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण, वय ३३, रा. टेकडी तांडा, बाघळुज, पिंपरखेड, ता. आष्टी, जिल्हा बीड असे
असल्याचे सांगितले. त्याची व मोटार सायकल झडती घेतली असता त्यांचे पॅन्टचे खिशामध्ये एका प्लॉस्टिकच्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याचेकडे पॅन्टचे खिशात मिळुन आलेल्या दागिन्या बाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे इतर तीन साथीदारासह चार महिन्यापुर्वी रात्रीचे वेळी अहमदनगर शहरातील भिस्तबाग महाल परिसरात नाल्या जवळील एका घरातुन सोन्याचे दागिने चोरी केले अशी कबुली दिली. ताब्यातील आरोपीने सांगितलेल्या त्याचे इतर तीन साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने तोफखाना पोलीस स्टेशन अभिलेख पडताळणी केली असता तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७१ / २०२२ भादविक ४५७, ३८० प्रमाणे रात्रीची घरफोडीचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने आरोपी नामे लिमनेश चव्हाण यास २,६०,०००/- रु. किंमतीचे मंगळसूत्र, नेकलेस, अंगठी व ५०,०००/- हजार रु. किंमतीची CBZ मोटार सायकल असा एकूण ३,१०,०००/- रु. किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-

अ.क्र. १. २.पोलीस स्टेशन आष्टी, पोलीस स्टेशन जिल्हा बीड भिंगार कॅम्प, जिल्हा अहमदनगर
गु.र.नं.९५ / २०१८ भाविक ३२४, ३३६, ३२३, ५०४, ५०६ १७/२०१६ मो. व्हि. अॅक्ट १८४, १३८, १७७
३. तोफखाना पो. स्टे, जिल्हा अहमदनगर ४७१ / २०२२ भादविक ४५७, ३८०
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे