तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चौकात खेळला जातोय मटका “मस्त” नागरिक आहेत “त्रस्त”अवैध धंदे करणारे आहेत” बिनधास्त”!

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे उदा.मटका, बिंगो,हातभट्टी,सोरट,आदी धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.पण तोफखाना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.हे विशेष!
उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील “भिस्तबाग चौक” या ठिकाणी चालतोय मटका! विशेष म्हणजे पोलिसांची कोणतीही भीती नसल्यामुळे या गजबजलेल्या चौकात बिनधास्तपणे मटका खेळला जातोय ही बाब समोर आली आहे.
मटका खेळला जातोय” मस्त” नागरिक आहेत “त्रस्त”मात्र मटका चालविणारे आहेत एकदम “बिनधास्त” असाच अनुभव नागरिकांना येत आहे.पोलिसांना कारवाई करण्यात रस नाही का? की जाणीवपूर्वक कारवाई करण्यात दुर्लक्ष केले जाते आहे.की पोलिस आणि दोन नंबर धंदे करणाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहेत? म्हणून पोलिस कारवाई करण्यात कानाडोळा करत आहेत का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. एकंदरीतच भिस्त बाग चौकात मटका खेळला जातोय “मस्त”नागरिक आहेत “त्रस्त” अवैध धंदे करणारे आहेत “बिनधास्त”! अशा चर्चा भिस्तबाग चौकात दररोज नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहेत. यावर तोफखाना पोलिस काय कारवाई करणार याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.आम्ही अवैध धंदे कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत हे समोर आणनारच आहोत.
(भाग: ४)