सामाजिक

श्रमिक कल्याण कामगार संघटनेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अशोककुमार सकट यांची निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर (प्रतिनिधी)– अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोककुमार सोनबा सकट यांची श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या वेळी शिवालय फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राम शिंदे, संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष आशा आमले, सुनील ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, योगेश सकट, ऋषिकेश सकट आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे म्हणाले, “अशोककुमार सकट यांच्या समाजसेवेतून दिसून येणारे कार्य आणि सामाजिक भान लक्षात घेऊनच त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवे प्रोत्साहन मिळेल. कामगारांच्या प्रश्नांसोबतच पुरुषांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांना दिशा मिळेल. दक्षिण जिल्ह्यातील युवकांना कामगार चळवळीला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आहे.”
नवीन दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोककुमार सकट यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन. कामगार बांधवांच्या समस्या सोडविणे, त्यांचे हक्क आणि कल्याणासाठी कार्यरत राहणे, तसेच संघटनेचे बळ वाढविणे, हा माझा संकल्प आहे. समाजहिताच्या कार्याला प्राधान्य देऊन संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग ठेवणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे