उद्धव शिंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नाशिक येथील निर्माण फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सावित्री ज्योती सन्मान २०२२ पुरस्कार स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना प्रदान करण्यात आला.*
*नाशिक येथील रोटरी कम्युनिटी हॉल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम आफ्रिकेचे ग्रॅबियल लोपेस दा सिल्वा, पश्चिम आफ्रिकेचे किटॅनो आर्बीस्ता दस्ता, नाशिकचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, अभिनेता प्रशांत गरुड, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
*राज्यस्तरीय पुरस्कार आनंददायी*
*स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने आज पर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रातील वंचित उपेक्षितांना स्वार्थ भावनेने मदत केली आहे. तर गोरगरिबांचे उन्हाळा,हिवाळा, पावसाळ्यात संरक्षण व्हावे यासाठी छत्री व उबदार कपड्यांचे वाटप शहरातील विविध भागात केले. यामागे पुरस्कार मिळवण्याचा उद्देश नव्हता, मात्र त्यातून आत्मिक समाधान मिळत होते. आमच्या या कार्याची दखल घेत निर्माण फाउंडेशन ने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार निश्चितच आनंददायी आहे, या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी दिली.