ब्रेकिंग

बनावट एनओसी प्रकरणातील आरोपींवर राजद्रोहाचे वाढीव कलम लावावे सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी बनावट एनओसीचे मोठे रॅकेट अजूनपण कार्यरत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात राजद्रोहाचे वाढीव कलम लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी आर्मी स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट सही व शिक्क्यांचा ना हरकत दाखला, प्रस्ताव मंजुरीची तीन बनावट पत्रे सादर करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बनावट एनओसी प्रकरण उघड होण्यासाठी प्रशासन दखल घेत नसल्याने पवन भिंगारदिवे यांनी उच्च न्यायालयात 2019 मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करण्याआधी त्यांनी अनेक आंदोलन, उपोषण केले होते. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असताना, हे बनावट एनओसीचे मोठे रॅकेट अजूनपण सुरू असल्याचा आरोप भिंगारदिवे यांनी केला आहे.
या प्रकरणामध्ये आरोपींनी शासनाची फसवणुक करुन एक प्रकारे राजद्रोह केला आहे. या आरोपींवर वाढीव राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे