पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेत देहरे येथे महामंडळाच्या बस गाड्या थांबविण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या केल्या सूचना

नगर दि.११ प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेवून देहरे येथे महामंडळाच्या बस गाड्या थांबविण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली.मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला.
देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.