धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले! एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल!

अहमदनगर (प्रतिनिधी) दागिने चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.या घटनेची आधिक माहिती अशी
-दुचाकीवरून प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व दुसर्या दुचाकीवरील एका व्यक्तीचा मोबाईल असा ९० हजार रूपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील देहरे व विळद शिवारात घडली आहे.या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगल मच्छिंद्र दाभाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे पती त्यांच्या दुचाकीवरून नगर-मनमाड रोडने नगरच्या दिशेने येत होते.ते देहरे शिवारील बंद पडलेल्या नर्सरीजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चालू दुचाकीत फिर्यादी यांच्या गळ्यातील ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून धूम ठोकली.पुढे याच चोरट्यांनी दुचाकीवरून जाणार्या चेतन देविदास महल्ले यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरला.ही घटना विळद बायपास रोडवर खिंडीजवळ घडली.या प्रकरणी अधिक तपास एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.