राहाता पोलिसांनी केली मोठी कारवाई!

राहाता( प्रतिनिधी )गोमांस विक्री करणाऱ्या इसमासह त्याला आश्रय देणाऱ्याला अटक करण्यात राहाता पोलिसांना यश आले आहे.
-अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे अनेक दिवसांपासून हा सगळा प्रकार सुरू होता.मात्र,हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधितांना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.मुसा आजम शेख (वय ६९ वर्षे) आणि आकील सल्लाउद्दीन शेख अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,कोपरगाव येथील मुसा आजम शेख वय वर्षे ६९,हा राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील एका भिंती लगत छुप्या पध्दतीने गोमांस विक्री करत होता.याची माहिती काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी गेल्यावर संबंधिताला रंगेहाथ पकडले.यावेळी आजम शेख याला आकील सल्लाउद्दीन शेख यांनी आश्रय देऊन आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आजम शेख आणि आकील शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडील गोमांस जप्त केले.पुणतांबा येथील सुनील तरटे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीं विरोधात भादवि कलम २६९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे सुधारीत कलम ५ (क) आणि ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे.