“या” गावातील जिल्हा परिषद शाळेत चालणाऱ्या जुगारावर सरपंचाने केली कारवाई!

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर तालुक्यातील खारेकर्जुने या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जुगार अड्डा चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
खारेकर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हापरिषद प्राथमिक विद्यालय येथे जुगार अड्डा तयार करून तीन पत्ती जुगार खेळत होते.या तीन पत्ती जुगाराची माहिती गावचे सरपंच प्रभाकर मगर यांना मिळताच त्यांनी जुगार चालू असलेली जिल्हा परिषदेची शाळा गाठली.यावेळी जुगार खेळणाऱ्यावर त्यांनी धडक कारवाई करत . तीन पत्ती जुगार अड्डा उधवस्त केला. व सर्व जुगार खेळनारे यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठणकावून सांगितले. तीन पत्ती जुगार चालू असतांना गावातील सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ बोरूडे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत सर्व प्रकार समोर आणला आहे. खारे कर्जुने ग्रामपंचायत हद्दीत अवैध कारभार पुर्ण बंद करणार असे सरपंच प्रभाकर मगर यांनी सांगितले आहे. व सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे जाहीर केले आहे.