भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाविणाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी टाकला छापा!एकजण ताब्यात!

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहरात भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच वर सट्टा खेळणाविणाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत एकाला ताब्यात घेतले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
रविवार दि २३/१०/२०२२ रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास सहा पोलीस निरिक्षक रविद्र पिंगळे कोतवाली पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकातील मनोहर वाईन्स समोरील गाळ्याजवळ एक इसम त्याचे कडील मोबाईल वर भारत पाकिस्तान क्रिकेट मँच वर सट्टा लावणारा व खेळवीनारा इसम बसलेला आहे, अशी माहीती मिळाल्याने १७/४५ वा च्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथका सह सदर ठिकाणी जावून त्याचे वर छापा टाकला असता इसम नामे अमित सुभाषलाल गांधी वय ४२ वर्ष रा कोर्ट गल्ली अहमदनगर हा मिळुन आला व त्याचे कडे T २० मँच वर सट्टा लावणे करीता वापरत असलेले दोन मोबाईल फोन मिळुन आले तसेच त्याने त्या व्दारे काही लोकांना सट्टा खेळणे करीता लागणारे पासवर्ड व युजर आयडी पुरवल्याचे दिसुन आले तसेच त्यास सदरचा आयडी व पासवर्ड पुरविणारा परेश मुनोत हा असल्याचे निष्पन्न झाले असुन सद्या तो फरार आहे. सदर दोन्ही आरोपी है सट्टा खेळताना व खेळविताना मिळुन आले म्हणुन पोका अमोल दिलीप गाढे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं I ८३९ / २०२२ महा जुगार कायदा कलमांतर्गत गुन्हा रजि दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना योगेश खामकर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकाडे सोो, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र पिंगळे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकाँ अमोल गाढे, पोकॉ सुजय हिवाळे, पोकों संदिप थोरात, पोकाँ सोमनाथ राउत यांनी केली आहे.