जिल्हाधिकारी कार्यालयात “माहिती अधिकार दिन” साजरा

अहमदनगर दि.28( प्रतिनिधी ) सामान्य प्रशासन विभागाच्या 20 सप्टेंबर 2008 रोजीच्या शासन निर्णय नुसार 28 सप्टेंबर हा दिवस अंतराष्ट्रीय ” माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज 28 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे माहिती अधिकार दिन चे औचित्य साधून माहिती अधिकार अधिनियम, 2005 या कायदया विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ, अहमदनगर जिल्हा प्रशासकिय प्रशिक्षण प्रबोधिनीचे विशेष कार्यअधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती माळी, उपजिल्हाधिकारी भुसंपादन श्रीमती गाडेकर, उपजिल्हाधिकारी भुसंपादन श्रीमती आव्हाड व तहसिलदार (महसूल) श्रीमती आंधळे, तहसिलदार (सामान्य प्रशासन) श्रीमती आव्हाड, तहसिलदार (पुर्नवसन) श्री. वारुळे, तहसिलदार (पुरवठा) किशोर कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेस महसूल विभागाचे ज्ञानेश्वर कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत माहिती अधिकार अधिनियम, 2005 चे सखोल अभ्यासपुर्ण विश्लेषन करण्यात आले व उदाहरणासह काही केस स्टडी वरही चर्चा करण्यात आली. सन 2005 नंतर या कायदयात झालेल्या नविन तरतूदींवरही लक्षवेधण्यात आले. या कायदयाबरोबरच सहा गठ्ठे पध्दती व इतर दैनंदिन कामकाजा विषयी ही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी मार्गदर्शन श्री कांबळे यांनी, माहिती अधिकार कायदयाबाबत कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.