आष्टी दि. 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील महत्वाच्या जागृत तीर्थस्थाना पैकी एक जागृत तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्री. क्षेत्र मच्छिंद्रनाथगड म्हणजेच मायंबा!
दरवर्षी प्रमाणे पौष अमावसेला या ठिकाणी चार दिवस यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. याठिकाणी सद्गुरू चैतन्य श्री. मच्छिंद्र नाथांची संजीवन समाधी आहे. यावर्षी दिनांक 8 फेब्रुवारी पासून यात्रा उत्सवास प्रारंभ झाला आहे. गुरुवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 सावरगाव येथे कोठी मिरवणूक, दुपारी 3 ते 4 कोठी गडाकडे प्रस्तान, शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्या पासून नवनाथ भक्त मंडळ नगर यांच्यावतीने विशाल भंडारा तसेच भंडारघर ते मच्छिन्द्र नाथगड दुपारी 2 ते 5 नैवेद्य मिरवणूक, संध्याकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत सावरगाव येथे छबीना मिरवणूक, शनिवार दि.10 फेब्रुवारी सकाळी 8 ते 10 हजेरी कार्यक्रम, सकाळी 11 ते दुपारी 1 पैलवानांचे वजन नाथ स्टेडियम येथे, दुपारी 1 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत नाथ स्टेडियम येथे जंगी हगामा व सांस्कृतिक कार्यक्रम, रविवार दि. 11 रोजी धर्मनाथ बीज व यात्रेची सांगता अशा विविध कार्यक्रमानी हा यात्रा उत्सव बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बीड, अहमदनगर, मुबंई, ठाणे, पुणे, जालना, अमरावती तसेच राज्यातून व परराज्यातून देखील भाविक मोठ्या श्रद्धेने संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या ठिकानची भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा