सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपीच्या स्थनिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर (प्रतिनिधी) सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थनिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्रीमती.कृष्णवेणी गंगारत्नम पालती,(वय 47,रा. विनायक नगर, निजामाबाद,तेलंगणा) या दि. 15/05/22 रोजी शिर्डी येथे शॉपींग करीता रस्त्याने पायी जात असतांना अनोळखी दोन इसम मोटार सायकलवर राँग साईडने फिर्यादीचे समोरुन येवुन मोटार सायकलचया पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील 66,000/- रु किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले.सदर घटने बाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 219/2022 भादविक 394,34 प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात एक आरोपी निष्पन्न करुन त्यास गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मंगळसुत्रासह अटक करण्यात आली होती.परंतु यातील एक आरोपी घटना घडले पासुन फरार झाला होता.श्री.मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/विजय वेठेकर,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,विशाल दळवी,भिमराज खर्से,आकाश काळे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे करीता सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.पथक श्रीरामपूर शहर व परिसरात फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे ऋषी जाधव हा सुतगिरणी,ता.श्रीरामपूर येथे त्याचे राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/कटके यांनी मिळालेल्या माहितीची पडताळणी करणे करीता पथक सुतगिरणी,श्रीरामपूर येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम पायी येताना दिसला.त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने,त्याचे नाव ऋषी कैलास जाधव वय 21,रा.शक्तीनगर,सुतगिरणी,ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपी नामे ऋषी कैलास जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगचे एकुण 02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. शिर्डी 219/2022 भादविक 394,34
2. शिर्डी 105/2022 भादविक 392,34
सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.सौरभकूमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई शिर्डी पोस्टे करीत आहे.