ब्रेकिंगश्रद्धांजली
ज्वलंत नेतृत्व हनुमंत साठे यांच्या निधनाने मातंग समाजाचा बुलंद आवाज हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मातंग आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष दिवंगत हनुमंत साठे यांच्या अंत्ययात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार

नवी दिल्ली
रिपब्लिकन पक्षाचे मातंग आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांचे दि. 13 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी काढून सायंकाळी 5 वाजता धनकवडी स्मशानभूमी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आपले दि.14 सप्टेंबर चे सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीतून थेट पुणे विमानतळावर ना.रामदास आठवले यांचे आगमन दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार असून दिवंगत हनुमंत साठे यांच्या अंत्ययात्रेत ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री उशिरा ना.रामदास आठवले मुंबईत पोहोचतील.