देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या कौडाणे प्रतिनिधीपदी सामजिक कार्यकर्ते संभाजी शिंगाडे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)
कायद्याच्या चौकटीच्या बाहेर शासकीय व अशासकीय जे काम करतात व सर्वसामान्य शेतकरी यांचा लढा नेहमीच चालत असतो. अशा लढ्यात हातभार लावण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी आपल्या शिक्षणाचा वापर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी व जनतेला आधार देण्यासाठी लोकशाहीचा तिसरा डोळा समजुन सर्वसामान्यांना मदत करताना पाहून संभाजी शिंगाडे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत, देशस्तंभचे न्यूज नेटवर्कचे संस्थापक संपादक महेश भोसले , उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे,सामजिक कार्यकर्ते संजय ताकवाले, यांनी संभाजी शिंगाडे यांची कौडाणे प्रतिनिधी पदी निवड केली. यावेळी कौडणे ग्रामस्थांकडून व वैभव शिंगाडे भाऊसाहेब शिंगाडे अमोल शिंगाडे निखिल सूर्यवंशी संतोष गंगावणे चैतन्य गायकवाड व देशस्तंभ चे चांदे खुर्द प्रतिनिधी अमोल गंगावणे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.