जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य दौंड तालुका कार्यध्यक्ष पदी सारीकाताई भुजबळ यांची निवड

दौंड (प्रतिनिधी)जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य दौंड तालुका कार्यध्यक्ष पदी सारीकाताई भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.
त्याच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड अंतर्गत राहून पीडित, अन्यायग्रस्त महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शैक्षणिक सामाजिक आर्थिक उपक्रमांतर्गत विधायक कार्य करण्यासाठी नव्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रगल्भ प्रवाही वकृत्व,हिंमतवान,कणखर,लढवय्या, निर्भिड,अभ्यासू, कर्तृत्ववान,अशा महिला भगिनींना समाजात उज्वल कामगिरी करणाऱ्या नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड महिला संगठ्न मजबूत करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका कार्याध्यक्ष पदी सन्मान पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या निवडीबददल कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द गावातील देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे पत्रकार दिपक गावडे व
पत्रकार अमोल गंगावणे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.