राजकिय

बेरोजगारी हटाव, युथ बचाव.. भारत जोडो यात्रा जिंदाबाद… अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसची राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

अहमदनगर (प्रतिनिधी) : महागाई, तरुणांची बेरोजगारी असे मुद्दे घेऊन कन्याकुमारी ते कश्मीर अशा भारत जोडो यात्रेवर निघालेल्या काँग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरातील युवक काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बेरोजगारी हटाव, युथ बचाव, भारत जोडो यात्रा जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, अशी खा.राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात करत परिसर दणाणून सोडला.
शहर युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे, जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या समर्थनार्थ आयोजित या कार्यक्रमामध्ये आकाश अल्हाट, कृष्णा साबळे, स्वराज शिंदे, रवी यादव, सुदर्शन पवार, प्रणव मकासरे, ऋतिक जाधव, गौरव भोसले, विशाल कुऱ्हाडे, स्तवन सोनवणे, महेश काळे, गौरव घोरपडे, आनंद जवंजाळ, विवेक तरटे, आकांक्षा गुंजाळ, सुयोग ठाणगे, नवीन पारधे, कल्पक मिसाळ, प्रणित अल्हाट, समर्थ होळकर, विकी करोलीया आदींसह पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ त्यांची छायाचित्रं असणारे पोस्टर्स धरले होते. यावेळी बोलताना शहर जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे म्हणाल्या की, मी युवती आहे. मला राहुल गांधी देशातल्या तरुणांसाठी आश्वासक चेहरा वाटतात. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये निवडणुका आणत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना सक्रिय राजकारणात काम करण्याची संधी मिळवून दिली. मी निवडणूक लढले आणि त्यातून निवडणूक जिंकून आज या पदावर काम करीत आहे. आकांक्षा गुंजाळ यांनी नगर शहरातून देखील युवती मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे यावेळी म्हटले.
ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील म्हणाले की, भारतरत्न राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून तंत्रज्ञानावर आधारित आजचा २१ व्या शतकातील प्रगत भारत उभा आहे. तरुणाईला रोजगाराची संधी देण्याऐवजी पकोडे तळा असा अजब सल्ला देणारे पंतप्रधान या देशाला लाभले हे या देशातील तरुण पिढीचे दुर्दैव आहे. शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ म्हणाले की, पंतप्रधानांनी कोट्यवधी रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती. नवीन रोजगार तर निर्माण झाले नाहीत. पण रोजगार असणारे युवक बेरोजगार झाले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे