प्रशासकिय
जिल्हा नियोजन समितीची 3 आक्टोबर रोजी बैठक

अहमदनगर,दि.28 सप्टेंबर (प्रतिनिधी) राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक पं. जवाहरलाल नेहरु सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती डॉ. राजेंद्र भोसले यांनी कळविले आहे.