श्रद्धांजली

शिवसंग्रामप्रमुख विनायक मेटे यांच्या निधनाने  मराठा आरक्षणाचा महानायक हरपला – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षे सातत्याने भूमिका घेणारे संघर्षशील नेते शिवसंग्रामप्रमुख  माजी आमदार  विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षणाचा महानायक हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत विनायक मेटे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची दुःखद बातमी ही जीवाला चटका लावणारी आहे.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी जीवाला चटका लावणारी अत्यंत दुःखद बातमी कळताच ना.रामदास आठवले यांनी आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून एमजीएम रुग्णालय येथे जाऊन दिवंगत विनायक मेटे यांच्या  पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.दिवंगत विनायक मेटे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार असून त्यांच्या बीड येथे होणाऱ्या अंत्यविधीस ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. 
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे महायुती चे घटक पक्षाचे प्रमुख नेते होते.शिवस्मारक समिती चे ते अध्यक्ष होते. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी गरीब मराठा समाजाच्या प्रश्नासाठी नेहमी ठोस भूमिका घेतली.मराठा आरक्षणासाठी ते सतत लढत राहिले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले . मराठा आरक्षण परिषदेला ते उपस्थित राहिले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्य समर्पित करणारा एक झुंजार महानायक दिवंगत विनायक मेटे यांच्या रूपाने हरपला असल्याची शोकभावना  ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. 
 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे